Advertisement

मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम. सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर

५१.३६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम. सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील मे २०२३ मध्ये पार घेतलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्र (बी.कॉम. सत्र ५)  परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर केला.

बी.कॉम. अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेसाठी एकूण ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४ हजार ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १६ हजार ७८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २ हजार ६५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते आणि १५ हजार ८९२ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची एकूण टक्केवारी ५१.३६ टक्के इतकी आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आतापर्यंत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील विविध १२१ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या  http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.



हेही वाचा

मुंबई विद्यापीठात कर्मचाऱ्यांची कमतरता, 61% पेक्षा जास्त पदे रिक्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा