Advertisement

MU Exam: अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 'या' तारखांना

मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 20 जुलैच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

MU Exam: अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 'या' तारखांना
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 20 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या शासन आदेशानुसार मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 20 जुलैच्या सर्व 9 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या परीक्षा 26 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील.

परीक्षेला बसलेले विद्यार्थी बीए तृतीय वर्षाच्या सेमिस्टर 5 च्या पेपरसाठी खालील सुधारित वेळापत्रक तपासू शकतात जे यापूर्वी 20 जुलै रोजी नियोजित होते.

 विषय नवी तारीख जुनी तारीख

BA semester 5 papers (except 3A00135 and 3A0014)


July 26, 2023


July 20, 2023


BA semester 5 papers (except 3A00135 and 3A00145)


July 28, 2023


July 26, 2023


Remaining papers 


July 31, 2023


July 20, 2023

तसेच एमएससी (फायनान्स) सत्र 2, एमएससी व एमएमसी ( रिसर्च ) सत्र 2, एमएससी आयटी व सीएस (60:40 आणि 75:5),  एमएससी गणित (80:20) सत्र 2, एमएससी आणि एमएमसी ( रिसर्च ) सत्र 3, एमसीए सत्र 1, एमए (ऑनर्स) आणि एम कॉम (60:40)  सत्र 4 या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 31 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील.

तृतीय वर्ष बीए सत्र 5 मधील प्रोग्राम क्रमांक 3A00135 आणि 3A00145 च्या दिनांक 26 जुलै 2023 च्या सर्व परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव दिनांक 28 जुलै रोजी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी याबाबत माहिती दिली.



हेही वाचा

मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम. सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठात कर्मचाऱ्यांची कमतरता, 61% पेक्षा जास्त पदे रिक्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा