Advertisement

मुंबई विद्यापीठाचा निगरगट्टपणा, दिव्यांग विद्यार्थ्याच्या निकाल लटकवला, करिअर धोक्यात

आयडॉलच्या एम. कॉमचा विद्यार्थी प्रथमेश कोंडेकरने परीक्षा देऊनही त्याला गैरहजर दाखवून विद्यापीठाने त्याला नापासचा शेरा दिला अाहे. त्यामुळे प्रथमेशच्या शैक्षणिक वाटचालीत प्रचंड अडथळे निर्माण झाले अाहेत. दिव्यांग असूनही त्याला विद्यापीठात सारख्या चकरा माराव्या लागत असल्याने विद्यापीठाच्या निगरगट्टपणाची सर्वत्र निंदा होत अाहे.

मुंबई विद्यापीठाचा निगरगट्टपणा, दिव्यांग विद्यार्थ्याच्या निकाल लटकवला, करिअर धोक्यात
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका फक्त सामान्य विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही बसत आहे. आयडॉलच्या एम. कॉमचा विद्यार्थी प्रथमेश कोंडेकरने परीक्षा देऊनही त्याला गैरहजर दाखवून विद्यापीठाने त्याला नापासचा शेरा दिला अाहे. त्यामुळे प्रथमेशच्या शैक्षणिक वाटचालीत प्रचंड अडथळे निर्माण झाले अाहेत. दिव्यांग असूनही त्याला विद्यापीठात सारख्या चकरा माराव्या लागत असल्याने विद्यापीठाच्या निगरगट्टपणाची सर्वत्र निंदा होत अाहे. 


परीक्षा देऊनही नापास 

प्रथमेशने मे महिन्यात ‘एम.कॉम-२’च्या ४ विषयांची परीक्षा दिली. यातील १९ व २९ मे रोजी प्रथमेशने परीक्षा देऊनही या विषयांच्या निकालात त्याला गैरहजर दाखवून नापासचा शेरा देण्यात आला. परीक्षा देऊनही गैरहजर ठरवण्यात आल्याने प्रथमेशने परीक्षा केंद्रावरील हजेरीसह सर्व पुरावे विद्यापीठाला सादर केले. मात्र, या नंतरही परीक्षा विभागाने प्रथमेशच्या निकालाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.


अकाऊंटिंगमध्ये करिअरची इच्छा

प्रथमेशला ‘जेडीसी’ अभ्यासक्रम पूर्ण करत अकाऊंटिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. पण निकाल लटकल्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घेणार? यामुळे आमच्या मुलाचं करिअर धोक्यात आले आहे.

-प्रफुल्ल कोंडेकर, प्रथमेशचे वडील 


अभाविप करणार आंदोलन

प्रथमेशच्या निकालासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) विद्यापीठाला निवेदनही देण्यात अाल्याचं अभाविपचे अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितलं. तद्नंतरही निकालाची घोषणा न करणाऱ्या विद्यापीठाविरोधत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठाचे सर्व दावे फोल ठरल्याची टीकाही त्यांनी केली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा