Advertisement

'मिठीबाई' ठरलं मुंबईतलं उत्कृष्ट काॅलेज


'मिठीबाई' ठरलं मुंबईतलं उत्कृष्ट काॅलेज
SHARES

मिठीबाई काॅलेजने मुंबई विद्यापीठाचा यंदाचा उत्कृष्ट काॅलेजचा पुरस्कार पटकावला आहे. एका सर्वगुणसंपन्न काॅलेजचा हा गौरव असल्याचं मत मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट काॅलेज आणि आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार ग्रामीण आणि शहरी विभाग असे विभागून देण्यात येतात. शहरी भागातून मिठीबाई कॉलेजने हा मन पटकावला.


आणखी कुणाला पुरस्कार?

तर, २०१६-१७ साठीचा उत्कृष्ट काॅलेजचा पुरस्कार ग्रामीण भागातून दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स काॅलेज, दापोली आणि सोनपंत दांडेकर काॅलेज, पालघर यांना जाहीर झाला. २०१५-१६ साठी ग्रामीण भागाच्या वर्गवारीतून अण्णासाहेब वर्तक काॅलेज, वसई आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज, महाड यांना जाहीर करण्यात आला. तर शहरी भागातून सेंट अॅन्ड्रयुज काॅलेज आणि ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे काॅलेज, चेंबूर यांना उत्कृष्ट काॅलेजचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.



आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार

याचवेळी आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणाही करण्यात आली. मुंबई विद्यापीठ आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामीण भागातून डॉ. श्रीकांत चऱ्हाटे पिल्लाई, एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, रसायनी-खालापूर यांना तर शहरी विभागातून डॉ. विजय दाभोळकर, गुरुनानक काॅलेज, जीटीबी नगर, मुंबई यांना देण्यात आला.

तर, २०१६-१७ साठीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ग्रामीण भागातून प्रा. स्नेहलता पुजारी, तात्यासाहेब आठल्ये काॅलेज देवरुख आणि शहरी भागातून रेखा जगदाळे एच. बी. बीएड काॅलेज वाशी यांना देण्यात आला. तर ग्रामीण भागातून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार नरेश परदेशी, कार्यालयीन अधिक्षक कोकण ज्ञानपीठ कर्जत कॉलेज, कर्जत आणि प्रसाद गवाणकर, वरिष्ठ लिपिक रं.प. गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी यांना देण्यात आला. शहरी भागातून सचिन गराटे, ग्रंथालय परिचर डी.जी. रुपारेल कला,विज्ञान आणि वाणिज्य काॅलेज, माहीम आणि ए. एस. एम. सुंदरम, अधिक्षक गुरु नानक खालसा कॉलेज माटुंगा यांना गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आलं.


उत्कृष्ट कॉलेज हा किताब आमच्या लौकिकाला साजेसा आहे. याचं शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अभ्यासाव्यतिरिक्त विविध कलेत पारंगत विद्यार्थी यांना जातं. या सर्वांच्या साथीने हे यश प्रप्त झालं आहे. या पुरस्काराचा वापर भविष्यात स्वायत्तता मिळवण्यासाठी घेता येईल.

- डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा