तृतीय वर्ष बीए सत्र ५ चा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीए सत्र ५, बी.फार्मसी सत्र ७ व ८ यांसह इतर सात अभ्यासक्रमांचे एकत्रित १० परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

SHARE

मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीए सत्र ५, बी.फार्मसी सत्र ७ व ८ यांसह इतर सात अभ्यासक्रमांचे एकत्रित १० परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.  यातील बीए सत्र ५ या परीक्षेत १३ हजार ४५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील १३ हजार २३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ७ हजार ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या निकालाची टक्केवारी ५९.५८% टक्के इतकी आहे. दरम्यानं शुक्रवारी एकूण १० निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत २०६ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीए व्यतिरिक्त इतर ९ परीक्षांमध्ये २,५२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात १,४५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


४,१०३ शिक्षक

मुंबई विद्यापीठाकडे तृतीय वर्ष बीएच्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी ७५ हजार १९९ उत्तरपत्रिका दाखल झाल्या होत्या. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी ४ हजार १०३ शिक्षकांद्वारे करण्यात आली असून एकूण ६ हजार ४४२ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले.


बीएचा सुधारित अभ्यासक्रम

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बीए अभ्यासक्रम सुधारित करण्यात आलेला असून यंदा पसंतीनुसार श्रेणी पद्धत (Choice base credit system) राबविण्यात आलेली आहे. बीए मध्ये भाषाविषयक, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्राचे ३० विषय अंतर्भूत आहेत. यात मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य,गुजराथी साहित्य, उर्दू साहित्य, कन्नड साहित्य, सिंधी साहित्य, अरेबिक, फ्रेंच, जर्मन, पंजाबी, पाली, पर्शियन, रशियन, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र, भूगोल, प्राचीन भारतीय संस्कृती, वाणिज्य, गणित, स्टॅटेस्टिक्स, इस्लामिक स्टडीज, अॅन्थ्रॉपोलॉजी, शिक्षण व ग्रामीण विकास या विषयांचा समावेश आहे.


१० निकाल जाहीर

विद्यापीठाने बीए सत्र ५ बरोबरच विविध परीक्षांचे ९ निकाल जाहीर केले आहेत. यात तंत्रज्ञान विद्याशाखेचे एमई केमिकल इंजिनिअरींग सत्र १, एमई इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग सत्र २, एमई मेकॅनिकल इंजिनिअरींग (थर्मल इंजिनिंअरीगं) सत्र २, एमई इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग (पॉवर सिस्टीम इंजिनिअरींग) सत्र २ व एमसीए सत्र २ आणि औषधशास्त्र (फार्मसी) सत्र ७ व ८ या दोन परीक्षांचे आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे एमएमएस (जुना अभ्यासक्रम) सत्र ४ व एमएचआरडीएम द्वितीय वर्ष सत्र १ असे एकूण १० निकाल जाहीर करण्यात आले.हेही वाचा -

'आयपीएल'चा उद्धाटन सोहळा रद्द, शहीद जवानांना मदत

‘घाडगे & सून’चं ५०० भागांचं सेलिब्रेशनसंबंधित विषय
ताज्या बातम्या