Advertisement

मुंबई विद्यापीठाचा हेल्पलाईन नंबर, 'इथं' मिळतील परीक्षेसंदर्भातील उत्तरं

विद्यार्थ्यांना (students) मदत करण्याच्या उद्देशानं एक हेल्पलाइन नंबर (helpline number) आणि ईमेल पत्ता (Email address) प्रसिद्ध करम्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाचा हेल्पलाईन नंबर, 'इथं' मिळतील परीक्षेसंदर्भातील उत्तरं
SHARES

मंगळवारी, १२ मे, २०२० रोजी, मुंबई विद्यापीठानं  (Mumbai University) समुपदेशनाची आवश्यक्ता असलेल्या विद्यार्थ्यांना (students) मदत करण्याच्या उद्देशानं एक हेल्पलाइन नंबर (helpline number) आणि ईमेल पत्ता (Email address) प्रसिद्ध केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) केलेली शिफारस लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी याचा उपयोग विद्यापीठाच्या परीक्षांच्या प्रश्नांविषयी आणि कोरोनाव्हायरस (Coronavirus Update) साथीच्या आजारांशी संबंधित इतर समस्यांसंबंधित मदत मिळविण्यासाठी करू शकतात. (coronavirus pandemic)

विद्यार्थ्यांनी परीक्षा आणि प्रवेशाशी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न संघामार्फत पुरवले जातील. शिवाय विद्यार्थीे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान 96190 34634 आणि  93737 00797 वर कॉल करू शकतात किंवा examhelpline@mu.ac.in वर ईमेल करू शकतात. इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग (IDOL) अंतर्गत नोंदणीकृत विद्यार्थी आपले प्रश्न info@idol.mu.ac.in वर पाठवू शकतात.

आगामी २०२०-२१ या नवीन शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांचे आणि प्रवेशांचे वेळापत्रक देखील अधिकारी तयार करीत आहेत आणि लवकरच कृती आराखड्याची घोषणा केली जाईल.

नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार फेसबुक लाइव्हवर उदय सामंत यांनी सांगितलं की, कोरोनव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांचे निकाल एकत्रित आणि युजीसीने ठरवलेल्या प्रोटोकॉलवर आधारित असतील. तथापि, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांना हजेरी लावावी लागेल. परंतु राज्यातील कोरोनाव्हायरस परिस्थितीच्या आधारे या संदर्भात २० जूननंतर निर्णय घेण्यात येईल.

काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शविली आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आपले संदेश सोशल मीडियावर शेअर केले होते. युवा सेनेच्या सेनेच्या युवा संघटनेनेही विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आणि युजीसीला विनंती पत्र लिहले आणि परिक्षा रद्द करम्याची मागणी केली.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा