Advertisement

विद्यार्थ्यांनो, निकालात घोळ असेल, तर येथे करा तक्रार!


विद्यार्थ्यांनो, निकालात घोळ असेल, तर येथे करा तक्रार!
SHARES

न्यायालयाला दिलेली डेडलाईन पाळण्याच्या नादात मुंबई विद्यापीठानं निकालपत्रात असंख्य घोळ घालून ठेवले आहेत. यामुळं विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्यांचं शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलं आहे. अशा विद्यार्थ्यांच्या निकालातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठानं www.asia-sp.in/MU/result.php या वेबसाईटवर तक्रारी करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं आहे.

मुंबई विद्यापीठानं आतापर्यंत विविध शाखांचे ४६३ निकाल जाहीर केले आहेत. न्यायालयाला दिलेली पाचवी डेडलाईन पाळण्यासाठी विद्यापीठानं अक्षम्य घाई करताना विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये असंख्य चुका केल्या आहेत. काहींच्या गुण आणि विषयांमध्ये तफावत आहे. तर काही विद्यार्थ्यांना चक्क परीक्षेला गैरहजर असल्याचं दाखवून नापास करण्यात आलं आहे. यामुळं विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल संकटात आली आहे.

अशा विद्यार्थ्यांच्या निकालातील त्रुटी दूर करण्यासाठी विद्यापीठानं www.asia-sp.in/MU/result.php ही वेबसाईट तयार केली असून तेथे विद्यापीठाने तक्रार दाखल करावी, असं आवाहन केलं आहे.


विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अडचणी, तक्रारी या नवीन वेबसाईटवर दाखल कराव्यात. त्याचबरोबर निकालही याच वेबसाईटवर असल्यामुळं विद्यार्थ्यांना निकाल पाहून, तक्रार दाखल करणे सहज शक्य होईल. प्रत्येक तक्रारींचं निवारण करण्यात येईल.
- डॉ. धीरेन पटेल, प्र कुलगुरू


विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये विषयनिहाय गैरहजर असा शेरा येत असल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी निकालाच्या शेवटच्या रकान्यातील शेरा बघावा. त्यात RR असा उल्लेख असल्यास त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
- अर्जुन घाटूळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक



हे देखील वाचा -

 निकाल जाहीर झाला, पण आम्ही नाही पाहिला!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा