Advertisement

'परीक्षेला हजर असल्याचा पुरावा द्या, पास व्हा', विद्यापीठाची अजब युक्ती


'परीक्षेला हजर असल्याचा पुरावा द्या, पास व्हा', विद्यापीठाची अजब युक्ती
SHARES

मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ सुरू असताना अखेर ९० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विधी शाखे (लॉ)चा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती आला. पण निकाल हाती येऊनही विद्यार्थ्यांची निराशाच झाली. कारण बहुतांश विद्यार्थ्यांच्या निकालात 'नापास' असा शेरा आला आहे. विशेष म्हणजे निकालात 'गैरहजर' असा शेरा आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. परीक्षा देऊनही आम्ही 'नापास' कसे? अशी विचारणा या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाला करताच 'परीक्षेला हजर असल्याचा पुरावा दाखवा आणि पास व्हा' असे अजब उत्तर त्यांना विद्यापीठाकडून देण्यात येत आहे.

शेवटी हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडेच परीक्षेच्या दिवसाची हजेरी मागितली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही निकाल लागलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना स्कॅनिंग सुरू आहे, गुणपत्रिका डाऊनलोड व्हायला वेळ लागतो आहे. येत्या १० दिवसांत तुम्हाला निकाल मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिली जात आहेत.

विद्यापीठापुढे हात टेकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना ट्वीट केले आहे. ‘आम्ही लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहोत. आम्हाला परीक्षेला बसूनदेखील, गैरहजर दाखवून नापास केले आहे. कॉलेजही आम्हाला मदत करत नाही. कृपया आम्हाला मदत करा.’ अशा आशयाचे ट्वीट विद्यार्थ्यांनी गलगली यांना केले आहे.


'लॉ'च्या विद्यार्थ्यांनी मला ट्विट केल आहे. त्यांचा निकाल मिळावा यासाठी मी त्यांना विद्यापीठाकडून हजर असल्याचा दाखला घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी मी केली आहे.
- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते



हे देखील वाचा -

'या' वेबसाईटवर तुम्हाला दिसेल निकाल!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा