Coronavirus cases in Maharashtra: 691Mumbai: 377Pune: 82Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Pimpri Chinchwad: 20Nagpur: 17Ahmednagar: 17Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Aurangabad: 5Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

मुंबई विद्यापीठाचा 'मायमराठी' प्रकल्प, आता जगात कुठेही शिका मराठी


मुंबई विद्यापीठाचा 'मायमराठी' प्रकल्प, आता जगात कुठेही शिका मराठी
SHARE

आता जगात कुठेही आणि कोणालाही मराठी भाषा शिकता येणार आहे. कारण अमराठी भाषिकांसाठी राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाने मराठी भाषा अध्ययन हा प्रकल्प संयुक्तरित्या हाती घेतला आहे.

भारतीय भाषांच्या उत्तम अध्यापनासाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाने अध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञ यांना एकत्र करून अन्यभाषिकांना मराठी अध्यापनाचा प्रकल्प ‘मायमराठी’ या नावाने सुरू केला आहे. एकूण १ ते ६ पातळ्यांवरील अभ्यासक्रम तयार करणे, असं या प्रकल्पाचं स्वरुप आहे.
 

राज्य मराठी विकास संस्थेची उद्दिष्ट्ये

  • अमराठी समाजगटांना मराठी भाषा आणि संस्कृती यांच्याबद्दल आस्था आणि रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे संस्थेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मराठीच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या विस्तार सेवा देणे
  • अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आखणे
  • परस्पर सहकार्याने पाठ्यक्रम
  • पुस्तकनिर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यनिर्मिती करणे
  •  भाषिक पाया सुधारण्यासाठी अध्ययनसामग्री निर्माण करणे
  •  प्रशिक्षणाची उपकरणे विकसित करणे आणि अन्य आवश्यक उपक्रम राबवणे

 ही उद्दिष्टे ठेवून या प्रकल्पाची योग्य आखणी करण्याचं नक्की करण्यात आलं आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांच्यामध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प राबवण्यात येईल.


असा असेल अभ्यासक्रम

या प्रकल्पातून अन्यभाषिकांना मराठी शिकवण्यासाठी एकूण ६ म्हणजे उर्वरित ५ पातळ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाठ्यपुस्तके, स्वाध्याय-पुस्तके, लहान शब्दसंग्रह आणि संपादित/निर्मित दृकश्राव्य सामग्री-सीडी/डीव्हीडी इत्यादी - ऑफलाइन आणि ऑनलाइन सामग्रीचा समावेश आहे.

पातळी १ ते ६ मध्ये अन्य भाषिकांना मराठी कसे शिकवावयाचे याबाबत टप्प्याटप्याने संवाद आणि व्याकरण यांचा विचार करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या पातळी दोनचं काम पूर्ण झालेले आहे. या प्रकल्पांतर्गत काही लघू अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये परिचारिका, टॅक्सी-रिक्षाचालक, शासकीय अधिकारी आणि बँकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.

आधुनिक काळानुसार हे सर्व अभ्यासक्रम आंतरजालीय/संगणकधारित/चलभाषा संचावर आधारित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी अॅन्ड्रॉइड ॲपची देखील निर्मिती करून ती मुक्तस्रोत स्वरुपात सर्वसामान्य अमराठी भाषिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.


महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झालेल्या अमराठी भाषिकांना शास्त्रशुद्ध रीतीने मराठी भाषा शिकवण्यासाठी खास तयार केलेला अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने या क्षेत्रात आजवर विविध संस्थांनी प्रयोग केलेले आहेत. मात्र त्यात कालानुरुप बदल होणे गरजेचे होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभागाचा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेला प्राप्त झाल्यावर या प्रस्तावाचा सांगोपांग विचार करूनच हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
- विनोद तावडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

संबंधित विषय
संबंधित बातम्या