Advertisement

मायक्रोबायोलॉजीचा पेपर ९ फेब्रुवारीला


मायक्रोबायोलॉजीचा पेपर ९ फेब्रुवारीला
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या एमएसी मायक्रोबायलॉजीची परीक्षा २३ जानेवारी ऐवजी आता ९ फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई विद्यापीठाने यासंदर्भात परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या एमएससी सत्र परीक्षेतील मायक्रोबायोलॉजीची परीक्षा मंगळवारी २३ जानेवारीपासून घेण्यात येणार होती.


का पुढे ढकलली परीक्षा?

या आधी ही परीक्षा डिसेंबरमध्ये होणार होती. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाची एकही तासिका झालेली नव्हती. त्यामुळे परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विद्यापीठातील एमएससीचे विद्यार्थी विचारत होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील ही परीक्षा पुढे ढकलून जानेवारीमध्ये ठेवण्यात आली होती.

काही तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी होणारी मायक्रोबायोलॉजीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाने नवीन वेळापत्रक जारी केलं आहे. तारीख पुढे गेली असली, तरी परीक्षेची वेळ आणि ठिकाण कायम राहिल, असंही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही 

आठवड्याभरात पुनर्मूल्यांकनाचे निकाल होणार जाहीर, प्रभारी कुलगुरूंची ग्वाही

एलएलएमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, मुंबई विद्यापीठाला दणका!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा