Advertisement

एलएलएमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, मुंबई विद्यापीठाला दणका!


एलएलएमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, मुंबई विद्यापीठाला दणका!
SHARES

एलएलएमची प्रवेश प्रक्रियेपासून अवघ्या १२ दिवसांमध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेवर काही विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आणि कोर्टात धाव घेतली. या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 'ज्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेला बसायचे असेल, ते बसू शकतील आणि जे बसणार नाहीत, त्यांना कॉलेज आणि विद्यापीठाने नापास म्हणून गृहीत धरू नये. त्यांना दुसऱ्या सत्रासोबत पहिल्या सत्राची परीक्षा देण्यास मुभा असेल', असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

अभ्यास करायला वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात पुनर्विचार करून फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घ्यावी, अशी मागणी 'स्टुडंट लॉ कौन्सिल'तर्फे करण्यात आली होती. त्यासंदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती.


पुढच्या वेळी ही विद्यापीठाने आधी अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ द्यावा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला पुन्हा आंदोलन करण्यास विद्यापीठाने भाग पाडू नये.

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल


काय आहे प्रकरण?

मुंबई विद्यापीठात एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, एलएलएमचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकच सेंटर आहे. मुंबईत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच एलएलएमच्या अभ्यासक्रमाचे वर्ग घेतले जातात. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लांबली. मात्र, विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रकात बदलले नाही. एलएलएमच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती वर्तविली जात होती. अजूनही पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंत लेक्चर्स ठेवण्यात आली आहेत.



हेही वाचा

कुणी कुलगुरू देतं का कुलगुरू... विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा