Advertisement

बी. कॉम.च्या २ पेपरच्या वेळापत्रकात बदल

मंगळवारी २८ नोव्हेंबरला होणारे बी कॉमचे दोन पेपर आता २ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली.

बी. कॉम.च्या २ पेपरच्या वेळापत्रकात बदल
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या बी. कॉम., सेमिस्टर ५ मधील दोन विषयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबरला होणारे हे दोन पेपर आता २ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली.


'हे' आहेत ते २ पेपर

बी. कॉम. सेमिस्टर ५ मधील सीबीएसजीएस आणि ७५:२५ पॅटर्नच्या अप्लाईड कम्पोनेन्ट ग्रुप मधील 'एक्स्पोर्ट मार्केटींग' आणि 'ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट' या विषयाची परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत होणार होती. मात्र त्याऐवजी ही परीक्षा अाता २ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांनो नोंद घ्या

बदललेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाची नोंद कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी, असं आवाहन परीक्षा विभागाकडून करण्यात आलं आहे. बदलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला यावं, असंही विद्यापीठाने म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा