Advertisement

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक: ३ मतदार संघाचे निकाल जाहीर


मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक: ३ मतदार संघाचे निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पहिल्या टप्प्यातील निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबई विद्यापीठाच्या ३ विद्यापीठ अध्यापक, १० प्राचार्य आणि ६ व्यवस्थापनाचे प्रतिनिधी या जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली होती. यामध्ये प्राचार्य गटातील १० जागा आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधीसाठी ६ जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. तर विद्यापीठ अध्यापक या गटातील ३ जागांसाठी ७ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान घेण्यात आलं होते. यामध्ये खुल्या प्रवर्गातून डॉ. सुरेश मैंद, महिला प्रवर्गातून डॉ. संगिता पवार आणि अनुसुचित जाती प्रवर्गातून डॉ. मृदूल निळे हे उमेदवार विजयी झाले.


एकूण ९५ टक्के मतदान

सिनेटवर विद्यापीठ अध्यापक गटातून ३ जागांसाठी  (खुला प्रवर्ग- ६, महिला- ४ आणि अनुसुचित जाती या राखीव प्रवर्गातून - ३) एकूण १३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. यावेळी एकूण १७४ मतदारांपैकी १६५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या गटासाठी एकूण ९५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये १५६ मते वैध ठरले तर ९ मते अवैध ठरले.


१० जागांसाठीची निवडणूक बिनविरोध

सिनेटवर प्राचार्य गटातून १० जागांसाठीची निवडणूक ही बिनविरोध झाली. यासाठी खुल्या प्रवर्गातून (५ जागा) विठ्ठल सुबराव शिवणकर, अजय मुरलीधर भामरे, शाम रघुनाथ जोशी, तुषार मनोहर देसाई आणि नागेंद्रनाथ पांडे हे खुल्या प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले. महिला प्रवर्गातून अनुजा नारायण पळसुले-देसाई, अनुसुचित जाती प्रवर्गातून विठ्ठल बळीराम रोकडे, विज-भज (डीटी-एनटी) प्रवर्गातून महादाप्पा गोंडा आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून धनाजी गुरव हे उमेदवार निवडून आले, तर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून एकही नामांकन न आल्यामुळे ही जागा रिक्त राहिली आहे.

सिनेटवर व्यवस्थापन प्रतिनिधीतून गटातून ६ जागांसाठीची निवडणूक ही बिनविरोध झाली. यासाठी खुल्या प्रवर्गातून (४ जागा) हृषीकेश गजानन पोळ, संजय बाबूराव शेटे, नील गिरीश हेळेकर आणि हसमुख देवजी रांभिया हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा