Advertisement

सिनेट निवडणूक: पदवीधर मतदान केंद्राच्या शोधात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवार २५ मार्च रोजी होणार आहे. यासाठी जवळपास ६२ हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. मुंबई विद्यापीठही या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाने अजूनही मतदारांना सिनेट निवडणुकीची माहिती देणारी पत्रिकाच पाठवलेली नाही.

सिनेट निवडणूक: पदवीधर मतदान केंद्राच्या शोधात
SHARES

सिनेट निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्व पक्षाच्या उमेदवारांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. तरिही नोंदणीकृत मतदारांना अद्याप मुंबई विद्यापीठाकडून माहिती पत्रिका पाठवण्यात आलेली नाही. माहिती पत्रिका न मिळाल्याने आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कुठे जाऊन मतदान करावं, याची कुठलीही माहिती मिळालेली नाही. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता व्यक्त करून विद्यार्थी संघटनांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.


सिनेट निवडणुकीविषयी उदासीन

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवार २५ मार्च रोजी होणार आहे. यासाठी जवळपास ६२ हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. मुंबई विद्यापीठही या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाने अजूनही मतदारांना सिनेट निवडणुकीची माहिती देणारी पत्रिकाच पाठवलेली नाही.

यामुळे २५ मार्चला होणाऱ्या निवडणुकीतलं मतदान घटण्याची शक्यता प्रहार विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस अजय तापकीर यांनी व्यक्त केली. विद्यापीठ प्रशासन सिनेट निवडणुकीविषयी किती गंभीर आहे, हे यावरून स्पष्ट होत असल्याचा दावाही त्यांनी केला.


यासंदर्भात आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. मात्र विद्यापीठाला पत्रिका पाठवण्याचा खर्च उचलणं शक्य नाही. पुढील आठवद्यात पाहू, अशी उत्तरं देण्यात आली. मतदारांना जागरूक करण्यासाठी पत्रिकांसाठी खर्च करता न येणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. एखाद्या पक्षालाच फायदा मिळवून देण्यासाठी विद्यापीठ असं करत तर नाही ना? अशी शंकाही यातून येत आहे.
-अजय तापकीर, उमेदवार (प्रहार संघटना), सिनेट निवडणूक


आतापर्यंत काय पद्धत?

मुंबई विद्यापीठाकडून दर सिनेट निवडणुकीच्या आधी सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्राचा तपशील देणारं पत्र पाठ्वलं जातं. यंदा ही यादी वेबसाईटवर उपलोड करण्यात आली आहे. त्यातही असंख्य चुका असून नाव शोधताना मतदारांच्या नाकीनऊ येत असल्याच्या तक्रारी मतदार करत आहेत.

प्रत्येक विद्यार्थी संघटनेकडून वैयक्तिक पातळीवर प्रचार सुरु असून त्यातून मतदारांना माहिती दिली जात आहे. परंतु ही जबाबदारी विद्यापीठाची असल्याचं संघटनेने स्पष्ट केलं आहे. ऑनलाईन नोंदणीत अनेक अडचणी असताना विद्यापीठाने मतदारांना सूचीत करणं हे त्यांचं कर्तव्यच असल्याचं मत उमेदवारांनी स्पष्ट केलं.


विद्यापीठाकडून यंदा मतदारांना माहिती पत्रिका पाठवण्यात न आल्याने मतदानाला याचा फटका निश्चितपणे बसणार आहे. यामुळे मतदानाचा टक्का घसरू शकतो. आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे यासंबधी मागणी केली होती, मात्र टी जबाबदारी शेवटी संघटनानांवरच येऊन पडली.
-अनिकेत ओव्हाळ, प्रदेश मंत्री, अभाविप



हेही वाचा-

सिनेट निवडणुकीसाठी मुंबई विद्यापीठ सज्ज

सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या दुर्गेचा अर्ज बाद, मनसेच्या सुधाकर तांबोळीची माघार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा