Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर
SHARES

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील (सिनेट) अध्यापकांच्या १० जागांचे निकाल जाहीर झाले आहे. १६ मार्च २०१८ रोजी अध्यापकांच्या गटातील १० जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. या १० जागांच्या निकालासाठी रविवारी मतमोजणी करण्यात आली.


हे उमेदवार विजयी

यामध्ये ५ जागांसाठी खुल्या प्रवर्गातून अनंत नाना लोखंडे, वैभव एकनाथ नरवडे, चंद्रशेखर सदानंद कुलकर्णी, निशा मनोज मुनी, मोहम्मद ताहीर हे उमेदवार निवडून आले आहेत. तर राखीव प्रवर्ग अनुसूचित जाती या प्रवर्गातून गुलाबराव बापू राजे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून रविकांत सांगुर्डे, विजा/ भज (डीटी/एनटी) प्रवर्गातून प्रकाश दामोदर दातार, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्रनाथ सोन्याबापू रसाळ आणि महिला प्रवर्गातून आरती प्रसाद हे उमेदवार निवडून आले आहेत.


ही जागा रिक्त

या १० जागांसाठी एकूण ३० उमेदवार उभे होते. एकूण ३६९१ मतदारांपैकी ३०१९ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. त्याबरोबर विद्यान परिषदेवरील प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधीत्व करणारे ०२ अध्यापकांच्या ०८ जागांचे निकालही घोषित करण्यात आले. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी महिला प्रवर्गाच्या १ जागेसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये तनुजा किरण सरोदे या बिनविरोध निवडून आल्या. याच विद्याशाखेच्या अनूसुचित जमाती प्रवर्गातून एकही अर्ज न आल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेसाठी खुल्या प्रवर्गातून मेघा संदीप सोमानी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एकही अर्ज न आल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा