Advertisement

विद्यार्थ्यांना मोबाइल रिचार्जसाठी ५०० रुपये, नवी मुंबई पालिकेचा निर्णय

नवी मुंबई पालिकेच्या शाळेत जाणारे विद्यार्थी हे झोपडपट्टी भागात राहणारे आहेत. कोरोनाकाळात अनेकांचे काम गेले आहे. त्यामुळे काही लोकांना मोबाईल रिचार्ज करणंही शक्य नाही.

विद्यार्थ्यांना मोबाइल रिचार्जसाठी ५०० रुपये, नवी मुंबई पालिकेचा निर्णय
SHARES

कोरोना (coronavirus)  लॉकडाऊन (lockdown) मुळे शाळा (school) आणि कॉलेज बंद ठेवण्यात आहेत. विद्यार्थ्यांचे (student) शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासकीय आणि खासगी शाळांमध्ये ऑनलाईन क्लास घेतले जात आहेत. मात्र, अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल रिचार्जसाठी (mobile recharge) पैसे नसल्याने ऑनलाईन क्लास (online class) मध्ये सहभागी होता येत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) आता ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाइल रिचार्जसाठी ५०० रुपये (Rs 500) देण्याचा निर्णय घेतला आहे.   

गेल्या वर्षी लॉकडाउन लागल्यापासून पालिकेच्या शाळा बंद असू  ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. मात्र, पालिकेतील अनेक विद्यार्थी गरीब कुटुंबातून असून त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाइल इंटरनेट कनेक्शन विकत घेता येण्यासाठी पालिका प्रत्येक विद्यार्थ्याला ५०० रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या ७२ शाळांमध्ये ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  नवी मुंबई पालिकेच्या शाळेत जाणारे विद्यार्थी हे झोपडपट्टी भागात  राहणारे आहेत. कोरोनाकाळात अनेकांचे काम गेले आहे. त्यामुळे काही लोकांना मोबाईल रिचार्ज करणंही शक्य नाही. अनेक पालकांना मोबाइल इंटरनेट घेणं परवडत नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन क्लाससाठी हजेरी लावू शकत नव्हते. 

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं की, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.  शाळा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही ऑनलाइन शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावं यासाठी योजना आखत आहोत. मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून इंटरनेट रिचार्ज त्यापैकी एक असल्याचं समोर आलं आहे.

 आम्ही विद्यार्थ्यांना ५००  रुपये देणार आहोत जेणेकरुन किमान तीन महिने त्यांना इंटरनेट मिळेल. या पैशांचं वाटप कसं करायचं यासंबंधी पालिका प्रस्तावावर काम करत असून पालकांचा खात्यात हे पैसा जमा करण्याचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  १६०० विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोनच नसून ही समस्या सोडवण्याचाही पालिकेचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 



हेही वाचा - 

ओशिवरातील रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा