Advertisement

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

कोरोना काळातल्या तणावपूर्ण वातावरणात हा डान्स या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताण कमी करणाराच ठरला असावा.

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!
SHARES

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. मुंबईसह राज्यात मागील २ महिन्यांपासून कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट धडकली. त्यामुळं अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली असून, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढताना दिसून आला. त्यामुळं कोविड सेंटरमध्ये (covid 19) आलेला रुग्ण हा बरा होऊनच घरी गेला पाहिजे यासाठी अनेक डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे डॉक्टर तणावाखाली वावरत आहेत. मात्र मुंबईच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची रुग्णांना आधार देण्यासाठी डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये कोविड सेंटरमधले आरोग्य कर्मचारी सैराट चित्रपटातल्या झिंगाट गाण्यावर फुल्ल ऑन धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

गोरेगावमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (bmc) कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. त्या गोष्टीला २ जून रोजी म्हणजेच बुधवारी १ वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं एक मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स पीपीई किट घालून सैराट चित्रपटातल्या झिंगाट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे सर्व कर्मचारी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्ज-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रोहित पवार कर्जत तालुक्यातल्या गायकरवाडी इथल्या कोविड सेंटरमध्ये तिथल्या रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावरच ठेका धरताना दिसले होते. या रुग्णांशी संवाद साधत यावेळी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला होता.हेही वाचा -

वसई-विरार पालिकेनं राबवली डोर टू डोर मोहीम

COVID-19 Second Wave: मे मध्ये ० ते १८ वयोगटातील फक्त ०.०७% मुलांना कोरोनाचा संसर्ग

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा