जोगेश्वरीत उभारणार महानगरपालिकेची शाळा

 Goregaon
जोगेश्वरीत उभारणार महानगरपालिकेची शाळा

जोगेश्वरी - एकीकडे पालिकेच्या शाळा बंद पडत असताना दुसरीकडे पश्‍चिम उपनगरातील काही भागांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांची मागणी वाढली आहे. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन जोगेश्‍वरी पूर्वेकडील पुनमनगर येथे अत्याधुनिक अशी महानगरपालिकेची पाच मजली शाळा उभारली जाणार आहे. त्यानुसार या शाळेचं भूमीपूजन खासदार गजानन कीर्तीकर तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते रविवार ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आलं.

Loading Comments