Advertisement

रात्रशाळा शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा


रात्रशाळा शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
SHARES

मुंबईतील रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अर्धवेळ रात्रशाळा शिक्षकांचं गेल्या ६ महिन्यांपासून थकलेलं वेतन सुरू करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. याआधी शिक्षक परिषदेनं तावडे यांची भेट घेत रात्रशाळा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची व्यथा मांडत पूर्णवेळ वेतन देण्याची मागणी केली होती.


यासंदर्भात शिक्षक परिषदेचं अनिल बोरनारे यांनी सांगितले की, याबाबत शिक्षक परिषदेनं शिक्षण विभागाकडं सातत्यानं पाठपुरावा केला होता. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं प्रथम शिक्षण उपसंचालकांपासून शिक्षण सचिवांपर्यंत साकडं घातलं होतं. मात्र तरीही पूर्णवेळ वेतन मिळत नसल्यानं अखेर गेल्याच आठवड्यात शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे रखडलेलं तसेच नियमित वेतन सुरू होणार आहे.

- अनिल बोरनारे, शिक्षक परिषद


आदेश होतं मात्र अंमलबजावणी नव्हती

मुंबईतील रात्रशाळांमधील दुबार काम करणाऱ्या शिक्षकांना कमी करून फक्त रात्रशाळेतच काम करणाऱ्या अर्धवेळ शिक्षकांना नियमित करण्याचा आदेश शिक्षण विभागानं याआधीच काढला होता. तसेच रात्रशाळेतील रिक्त पदांवर दिवसा शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यात आले. मात्र मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांत अतिरिक्त शिक्षक नसल्याने रात्र कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. शिक्षक उपलब्ध व्हावं म्हणून शासनानं दुबार काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतलं. पण त्यांचं वेतन सुरू केलं नव्हतं.

संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा