Advertisement

वाचन प्रेरणा दिनानिमित्त दप्तराचं ओझं नाही


वाचन प्रेरणा दिनानिमित्त दप्तराचं ओझं नाही
SHARES

मुंबई - भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील २१ अंध दिव्यांग शाळांना १०० ग्रंथांची (बोलक्या पुस्तकांची- ऑडीओ सीडीची) पेटी मराठी भाषा विभागाकडून भेट देण्यात येणार आहे.

प्रत्येक पेटीत १०० निवडक सीडीज अशा एकूण सुमारे २१०० सीडीज या संचांमध्ये असतील. महाराष्ट्रातील २१ जिल्हयांत, नॅब डॉ. मोडक संशोधन केंद्राच्या माध्यमातून,अंध दिव्यांग शाळांना प्रत्येकी एकेक ग्रंथपेटी भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली. तसंच नजिकच्या काळात वाचन प्रेरणा दिन हा नो गॅझेट दिवस म्हणून साजरा होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षीपासून डॉ. कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या (बोर्डांच्या) शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये, खासगी आणि सार्वजनिक ग्रंथालये, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्था, प्रकाशक, लेखक, पुस्तक वितरक, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या अशा सर्वच घटकांनी वाचन प्रेरणा दिनी कार्यक्रम आयोजित करावेत, असं आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा