इंजिनीअरिंग परीक्षेदरम्यान फक्त एक दिवस सुट्टी?

येत्या उन्हाळी परीक्षेदरम्यान इंजिनीअरिंगच्या परीक्षेमधील सुट्टी कमी करण्यात येणार आहे. यामुळे इंजिनिअरींग परीक्षेत दोन पेपरमध्ये फक्त एक ते दोन दिवस सुट्टी मिळणार असून यंदा ही परीक्षा अवघ्या १५ दिवसच चालणार आहे.

SHARE

इंजिनीअरिंग परीक्षेत एका पेपरनंतर दुसऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना हमखास पाच ते सहा दिवसांची सुट्टी असते. यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या पेपरचा अभ्यास करता येतो. परंतु इंजिनीअरिंगच्या परीक्षेमधील सुट्टी कमी करण्यात येणार आहे. यामुळे इंजिनिअरींग परीक्षेत दोन पेपरमध्ये फक्त एक ते दोन दिवस सुट्टी मिळणार असून यंदा ही परीक्षा अवघे १५ दिवसच चालणार आहे.


प्राचार्यांची तक्रार 

प्रत्येक इंजिनीअरिंग कॉलेजांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे आवश्यक असल्याचा नियम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे करण्यात आला आहे. या नवीन नियमासाठी कॉलेजांनी कशाप्रकारे तयारी केली आहे याबाबत आढावा घेण्यासाठी मुंबई विद्यापीठात नुकतीच इंजिनीअरिंग प्राध्यापकांची बैठक पार पडली. परंतु त्यावेळेस अशी इंटर्नशिप देण्यास वेळच मिळणार नसल्याची तक्रार काही प्राचार्यांनी विद्यापीठाकडे केली. 


एटीकेटी, नियमित परीक्षा एकत्र

या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाने परीक्षेच्या काळातील सुट्ट्या कमी करून नवीन वेळापत्रक तयार करावे. तसंच विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठीही कालावधी द्यावा असं सुचवण्यात आलं आहे. यानुसार यंदाच्या परीक्षेत एका पेपरनंतर दुसऱ्या पेपरसाठी पाच ते सहा दिवसांची सुट्टी न देता अवघी एक ते दोन दिवस सुट्टी देण्यात यावी. तसंच याच परीक्षेदरम्यान म्हणजेच दुपारच्या सत्रात एटीकेटी परीक्षेचे आयोजन करण्यात यावे, असेही सुचवण्यात आले आहे. परंतु याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसला, तरी अनेक विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.हेही वाचा -

ठाणे शहरासाठी आता वर्तुळाकार मेट्रो

मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहरसंबंधित विषय