Advertisement

ICSC, ISC चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर, गुणपत्रिका डिजिलाॅकरवर

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (ICSC) आणि ISC मंडळाचा दहावी- बारावीचा निकाल शुक्रवार दुपारी ३ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

ICSC, ISC चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर, गुणपत्रिका डिजिलाॅकरवर
SHARES

काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (ICSC) आणि ISC मंडळाचा दहावी- बारावीचा निकाल शुक्रवार दुपारी ३ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेत ९९.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बारावीच्या परीक्षेचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीआयएससीईने मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याने सीआयएससीईने निकाल जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली (online results declared of class 10th and 12th from icse and isc board ) नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला. 

गुणपत्रिका डिजिलाॅकरवर 

विद्यार्थ्यांना आपला निकाल www.cisce.org या संकेतस्थळावर पाहता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षार्थी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर ते एका क्लिकवर त्यांचा निकाल पाहू शकतील. ICSE बोर्डाने यासंदर्भात www.cisce.org या संकेतस्थळावर अधिकृत नोटीस जाहीर केली असून त्यात निकाल जाहीर करण्याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठीही अर्ज करता येणार आहे. शिवाय डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल लागल्यापासून पुढील ४८ तासात गुणपत्रकही घेता येईल. पुढील प्रवेशासाठी ही गुणपत्रिका ग्राह्य धरली जाईल.

निकाल काय?

ICSE मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १ लाख १२ हजार ६६८ मुलं होती. तर ९५ हजार २३४ मुली होत्या. यापैकी २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १३७७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

तर, ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला ८८ हजार ४०९ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ४७ हजार ४२९ मुलांचा समावेश होता. तर ४० हजार ९८० मुलींचा समावेश होता. यापैकी ८५ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर २७९८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा