Advertisement

सौर दिव्याच्या लखलखाटात आयआयटी उजळली, गिनीज बुकातही नोंद


सौर दिव्याच्या लखलखाटात आयआयटी उजळली, गिनीज बुकातही नोंद
SHARES

गांधी जयंतीच्या निमित्ताने 'आयआयटी मुंबई मध्ये मंगळवारी सुमारे ५ हजार ७०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सौर दिवे तयार करून ते प्रज्वलित करण्याचा विक्रम नोंदवला आहे. या विक्रमामुळे हीरक महोत्सव साजरा करत असलेल्या आयआयटी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पवई येथील आयआयटी मुंबईत महात्मा गांधी जयंतीदिनी विश्वविक्रम नोंदवला गेला असून देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी स्टुडंट सोलार अॅम्बेसिडर या कार्यशाळेत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी ‘सोलार स्टडी लॅम्प’ची जोडणी केली.


ही जगातील सर्वात मोठी सोलार लॅम्प असेंब्लिंग कार्यशाळा ठरली असून गिनीज बुकात त्याची नोंद झाली आहे. आयआयटी मुंबईच्या आवारातील जवळपास १०० शाळांमधील ५ हजार ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी बनवलेल्या सोलार लॅम्पमुळे आयआयटीचा परिसर अक्षरश उजळून निघाला होता.


५ हजार ७०० विद्यार्थ्यांचं योगदान

मुंबईतील शाळांमधील ५ हजार ७०० विद्यार्थ्यांचंही योगदान केंद्रीय रिन्यूएबल एनर्जी विभागाच्या सहकार्यानं आयआयटी मुंबईत देशव्यापी कार्यशाळा आयोजित केली गेली होती. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली सोलार लॅम्प्सच्या यशस्वीरीत्या जोडणी केली असून त्यासाठी सोलार लॅम्प कीट आयआयटीकडून दिलं गेलं होतं.

५०० रुपयांचं हे कीट विद्यार्थ्यांना १०० रुपयांत देण्यात आलं असून संध्याकाळी साडेपाच वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली. ती सव्वासात वाजता संपली आणि त्यानंतर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांनी मोजणी सुरू केली. या कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः जोडणी केलेलं सोलार लॅम्प घरी नेण्यासाठी देण्यात आलं.


आयआयटी मुंबईचा पुढाकार

वातावरणातील कार्बनचं प्रदूषण कमी करायचं असल्यास सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. २०२२ पर्यंत सौरऊर्जेचा १०० टक्के वापर करण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलं असून ते साध्य करण्यासाठी देशातील विद्यार्थ्यांमध्ये सौरऊर्जेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई विविध ठिकाणी पुढाकार घेत आहे.


हेही वाचा -

सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा