'एक वही एक पेन'ला उत्तम प्रतिसाद

 Mazagaon
 'एक वही एक पेन'ला उत्तम प्रतिसाद

भायखळा - भायखळ्यामधील बकरी अड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राववलेल्या 'एक वही एक पेन' उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव काळात मंडळाकडे जवळपास १,५९५ वह्या व १००० पेन मंडळाकडे जमा झाले आहे. 'या वह्या आणि पेनचे वाटप आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात येणार आहे', अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कमलेश डोके यांनी दिली.

Loading Comments