Advertisement

विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी ‘रुसा’चे पाठबळ


विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी ‘रुसा’चे पाठबळ
SHARES

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) च्या माध्यमातून राज्यातील विद्यापीठांसह सरकारी व अनुदानित कॉलेजांना आता अधिक सक्षम केले जाणार आहे. विद्यापीठ आणि सरकारी कॉलेजातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार करण्यासाठी आणि आवश्यक शैक्षणिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी रुसाचे पाठबळ दिले जाणार असल्याची घोषणा नुकतीच विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.


महाराष्ट्र मिशन ५००

राज्यातील पहिल्या टप्प्यातील यशानंतर रुसा आता 'महाराष्ट्र मिशन-५००' या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. त्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठात एक विशेष सादरीकरण रुसाच्या राज्य प्रकल्प संचालिका मीता राजीव लोचन यांनी करत याबाबतची घोषणा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रभारी प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, रुसा महाराष्ट्रचे मुख्य सल्लागार प्राचार्य विजय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


२७१ कोटींचा निधी

राज्यातील उच्च शिक्षणासाठी रुसाच्या माध्यमातून २७१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याअन्वये राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी संशोधन, इनोव्हेशन, संशोधनातील क्षमता विकसित करणे, अभ्यासक्रमात सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रशासनातील आमूलाग्र बदल असे विविध घटक हाती घेण्यात आले होते. रुसाच्या पहिल्या टप्प्यातील या यशानंतर 'रुसा २.०' या प्रकल्पाची महाराष्ट्रात 'महाराष्ट्र मिशन-५००' या नावाने सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध १४ घटकांचा समावेश करण्यात येणार असून निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निधीची उपलब्धता आणि वाटपासाठी विद्यापीठ तसेच अनुदानित शासकीय महाविद्यालयांची कामगिरी आणि फलनिष्पत्ती यावर जोर देण्यात येणार असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले आहे.


'महाराष्ट्र मिशन-५००'ची ठळक वैशिष्ट्ये

रुसा २.० मध्ये महाराष्ट्रातील ५०० सरकारी आणि अनुदानित कॉलेज आणि विद्यापीठांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये स्वायत्ततेसाठी सुलभीकरण आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०० कॉलेजांना मदत केली जाणार आहे. अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी गरजेनुसार शिक्षण, अॅड-ऑन कोर्सेस आणि नाविन्यपूर्ण शिक्षणक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. यासह इतर अनेक महत्त्वांच्या बाबींसाठी रुसा काम करणार आहे.


रुसाचं मिशन २०२१

महाविद्यालयांचा राष्ट्रीय मूल्यांकनाचा दर्जा अधिक दर्जेदार करण्यासाठी २०२१ पर्यंत ११७४ वरुन ३००० पर्यंत महाविद्यालयांची संख्या वाढविणे, नॅक मूल्यांकनामध्ये ७०० हून अधिक महाविद्यालयांचा समावेश करुन महाविद्यालयांच्या ग्रेडिंगमध्ये सुधारणा करणे, विद्यापीठांमधील संशोधनवृत्तीला चालना आणि संशोधनाचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी विद्यापीठांचा पीअर रिव्ह्यू जर्नलमधील टक्का वाढवणे, पेटंटच्या संख्येत वाढ करणे, निधी उपलब्ध करुन देणाऱ्या विविध संस्थासाठी संशोधन अहवालांत वाढ करणे, या बाबींसाठीही रुसा काम करणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा