Advertisement

स्कूल बस फीचे दर वाढण्याची शक्यता

येत्या काळात स्कूल बस फीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्कूल बस फीचे दर वाढण्याची शक्यता
SHARES

येत्या काळात स्कूल बस फीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, फीमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा विचार स्कूल बस मालक करीत आहेत. येत्या १ एप्रिलपासून १०० टक्के स्कूल बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

मागील दोन वर्षांपासून स्कूल बसेसची सेवा बंद आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्यानंतर पालकच आपल्या पाल्याची शाळेतून ने-आण करीत होते. पण आता शाळा पूर्ण वेळ ऑफलाईन भरू लागल्या आहेत. त्यामुळे नोकरीवर जाणारे पालक स्कूल बस कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

एसएससी बोर्डाच्या शाळांकडून स्कूल बसेसना प्रतिसाद फारसा मिळत नाही. आयसीएसई, सीबीएसईसह इतर इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांमध्ये स्कूल बसची मागणी अधिक आहे. या शाळांना सध्या सुट्टी सुरू असली तरी १ एप्रिलपासून त्या पुन्हा सुरू होणार आहेत.

ज्या मार्गावर स्कूल बसेसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अशाच मार्गावर स्कूल बस सुरू होणार असल्याची माहिती मिळते. पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच चालले असून आधीच्या फीमध्ये स्कूल बस पुरविणे कठीण आहे. काही शाळांमध्ये तर अद्याप पूर्ण बस भरेल इतके विद्यार्थीही बसने येत नाहीत. इंधनासोबतच चालक, वाहकाचा पगार, मेंटेनन्स, इतर खर्च भागवायचे असतील तर बसची फी वाढवावीच लागेल.

स्कूल बसची फी भरण्यासाठी आता पालकांना शाळेत येण्याची गरज नाही. पालकांच्या सोयीसाठी ओनर्स असोसिएशनने ऑनलाईन पेमेंटची सोय आणली आहे. पालकांना क्यूआर कोड दिला जाईल. तो स्कॅन केल्यावर फी भरता येईल, तसेच बसचा मार्गही पालकांना त्यात दिसणार असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा