सनातन धर्म हायस्कूलचे सत्य उघडकीस

सायन - येथील जी.टी.बी नगर येथे असणाऱ्या सनातन धर्म हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज येथे बुधवारी १ तारखेला शाळेच्या प्रवेशद्वाराच्या छताचे स्लॅब कोसळून काही मुले जखमी झाली तर मुस्कान (५) मुलीचा जीव या अपघातात गेला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी एकच आक्रोश करत शाळेबाहेर आक्रोश केला.

या आधीही या शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आणि सर्व पालकांनी या बद्दल शाळेच्या मुखाध्यापकांना दखल ही घ्यायला सांगितली. मात्र शाळा प्रशासन फक्त पैसे कमावण्यातच मग्न आहे त्यांना इतर गोष्टींची काहीच पडलेली नाही असा आरोप पालकांनी केला.

Loading Comments