Advertisement

विद्यार्थ्यांनो, ३० तारखेपासून भरा १७ नंबरचा फॉर्म


विद्यार्थ्यांनो, ३० तारखेपासून भरा १७ नंबरचा फॉर्म
SHARES

नापास झालेल्या किंवा काही कारणास्त्व नियमित शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या ३० जुलैपासून खासगीरित्या अर्ज करता येणार आहे. येत्या ३० जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून सुमारे एक ते दोन लाख विद्यार्थी १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्यानं नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरणं अनिर्वाय राहणार आहे. फक्त ऑनलाईन पदे्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. कोणत्याही कारणास्तव ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारणार नसल्याची सूचना राज्य मंडळानं विद्यार्थी, पालक, शाळा आणि महाविद्यालयांना दिली आहे.


अर्ज भरण्याची पद्धत

दहावीच्या परीक्षेकरता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर, तर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-hsc.ac.inया वेबसाईटवर अर्ज भरता येणार आहे.


ऑनलाईन अर्जाचं वेळापत्रक

  • विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरणे - ३० जुलै ते २५ ऑगस्ट
  • ऑनलाईन भरलेला अर्ज, शुल्क आणि अर्जासाठी लागणारी मूळ कागदपत्रं शाळेत किंवा महाविद्यालयात जमा करणं - ३१ जुलै ते २७ ऑगस्ट
  • शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रं आणि त्याची यादी विभागीय मंडळाकडे जमा करणं : ३१ ऑगस्ट


विद्यार्थ्यांसाठी काही सूचना :

  • अर्ज भरण्यासाठी वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजीमधून सूचना दिल्या आहेत. त्या वाचल्यानंतरच विद्यार्थ्यांनी अर्ज भरावा
  • अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत नसल्यास (द्वितीय प्रत), आधारकार्ड आणि पासपोर्ट आकारातील फोटो ही कागदपत्रं असणं आवश्यक आहे
  • अर्ज भरण्याआधी विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रं स्कॅन करून ठेवा. अर्ज भरण्याच्यावेळी ही कागदपत्रं अपलोड करावी
  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अनिर्वाय असणार आहे
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्याची संपूर्ण प्रत विद्यार्थ्यांना ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे
  • अर्जाची ही प्रत पाठवल्यानंतर त्याची प्रिंट आऊट, शुल्क पावती आणि हमीप्रताची दोन प्रत काढून त्यासह इतर कागदपत्र विद्यार्थ्यांना संबंधित शाळा व महाविद्यालयात मुदतीपूर्व भरावी लागणार आहे
  • अर्ज भरताना अडचणी आल्यास ०२०-२५७०५२०८ / २५६७६४०५ / २५७०५२७१
    या क्रमांकावर संपर्क साधा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा