Advertisement

अंतिम वर्षातील 'या' विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

व्यावसायिक परीक्षा रद्द करताना संबंधि शिखर संस्थांची मान्यताही आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या परीक्षा रद्द करण्याचे निर्दश देण्याची विनंती केली आहे.

अंतिम वर्षातील 'या' विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र
SHARES

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि अव्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा रद्द केल्या आहेत. अव्यावसायिक परीक्षांचा निर्णय जरी राज्य सरकारच्या अखत्यारितला असला, तरी व्यावसायिक परीक्षा रद्द करताना संबंधि शिखर संस्थांची मान्यताही आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या परीक्षा रद्द करण्याचे निर्दश देण्याची विनंती केली आहे. जोपर्यंत पंतप्रधानांचा यावर अपेक्षित निर्णय येणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम असणार आहे. 

 

हे पत्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात संसर्ग वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इ. शहरांमधील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटात परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांना धोक्यात टाकणं शक्य नसल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या अंतिम सत्रातील परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार जुलै महिन्यात घेण्यात येतील. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्था एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीला पत्र पाठवून या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे.

गुरुवारी CBSC आणि ICSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गानं या निर्णयावर दिलासा व्यक्त केला होता. आता राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील सर्व सेमिसटरच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत.  



हेही वाचा

पदव्युत्तर वैद्यकीयच्या परीक्षा पुढं ढकला, सरकारची केंद्राकडे मागणी

पदव्युत्तर वैद्यकीयच्या परीक्षा पुढं ढकला, सरकारची केंद्राकडे मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा