Advertisement

गोवंडी झोपडपट्टीतील ६ विद्यार्थी NEET परीक्षेत उत्तीर्ण

गोवंडी झोपडपट्टी गुन्हेगारी आणि इतर नकारात्मक कारणांसाठी ओळखली जाते. पण गोवंडीतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या सहा जणांनी हा गैरसमज दूर केला आहे.

गोवंडी झोपडपट्टीतील ६ विद्यार्थी NEET परीक्षेत उत्तीर्ण
SHARES

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे. याचचं उदाहरण मुंबईतल्या सहा NEET परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलं आहे. गोवंडी इथल्या झोपडपट्टीतील सहा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पास केली आहे. देशभरातील मुलांसाठी एक अद्भुत उदाहरणच त्यांनी ठेवलं आहे.

गोवंडी झोपडपट्टी गुन्हेगारी आणि इतर नकारात्मक कारणांसाठी ओळखली जाते, असा अनेकांचा समज आहे. पण गोवंडीतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या सहा जणांनी हा गैरसमज दूर केला आहे. NEET परीक्षा पास केलेला सहा पैकी एक विद्यार्थी आहे जईबा खान.

जईबा खानचे वडील डॉक्टर आहेत आणि त्यांनी एजन्सी एएनआयला सांगितलं की, "कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता होती. तेव्हाच तिनं ठरवलं की आपण वैद्यकीय प्रवेश परीक्षा द्यायची. फक्त द्यायचीच नाही तर आपण पास होऊ असा तिचा विश्वास होता."

जईबा म्हणाली की, “माझ्या बालपणात, मी माझ्या पालकांना दुसऱ्यांची मदत करताना पाहिलं आहे. भविष्यात त्यांच्यासाठी काम करण्याच्या उद्देशानं मी डॉक्टर होण्याचं ठरवलं. मला माझ्या पालकांचा पूर्ण पाठिंबा आहे. गोवंडी हे बर्‍याच नकारात्मक कारणास्तव ओळखले जाते. पण मी स्वत: ला त्यापासून दूर ठेवलं. माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी इतरांपासून दूर रहावं म्हणून मी माझे मित्र मंडळ मर्यादित ठेवले.”

गोवंडी परिसरातील डॉक्टरांची स्थानिक संघटना स्थापन करणारे डॉ. जाहिद खान म्हणाले की, “बहुतेक डॉक्टर या क्षेत्रात येण्याचं टाळतात. कारण या परिसराचं नाव नकारात्मक गोष्टींसाठी ओळखलं जातं. म्हणून आम्ही आमच्या स्वत: च्या मुलांना केवळ डॉक्टरच नव्हे तर अभियंता वकील बनण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.”

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात परीक्षा न घेण्याच्या बाजूनं देशाच्या सहा राज्यांबरोबरच महाराष्ट्रानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २८ ऑगस्ट रोजी, बिगर-भाजपा राज्यांतील सहा मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जेईई आणि एनईईटी प्रवेश परीक्षा केंद्राला घेण्यास परवानगी देण्यात आलेल्या आदेशाचा पुन्हा आढावा घ्यावा, असं याचिकेत नमूद केलं होतं.

सहा विद्यार्थ्यांनी एनईईटी पास करून वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. जर आम्हाला सरकारकडून चांगले सहकार्य मिळाल्यास भविष्यात एनईईटीमध्ये पात्रता घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी ६ ते १८ पर्यंत वाढू शकेल, असं महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कार्यमंत्री नवाब मलिक म्हणाले.

यापूर्वी वैद्यकीय प्रवेशासाठी एनईईटी आणि आयआयटी प्रवेशासाठी जेईई परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका एससीनं फेटाळली होती. हा निर्णय बर्‍यापैकी वादात सापडला होता.हेही वाचा

जेईई मेन्स परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा