Advertisement

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेशाच्या नियमित अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
SHARES

मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालं आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कोटा वगळून १ लाख १९ हजार १७१ जागा उपलब्ध होत्या. त्यातील १ लाख १६ हजार ८० जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना १८ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या नियमित अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवेश बंद करण्यात आले आहेत. ज्या महाविद्यलयात जागा उपलब्ध आहेत तेथील कट ऑफ गुणांमध्येही वाढ झाल्याने आता महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात शिल्लक जागेवर आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ६ हजार १७९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे ८ हजार ८६ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, ६ हजार ८३७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. चौथ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ५७ तर पाचव्या पसंतीचे महाविद्यलय मिळालेल्याची संख्या ५ हजार १७३ इतकी आहे.

तिसऱ्या गुणवत्ता यादीत अलॉटमेंट मिळालेल्या ४५ हजार ४०२ विद्यार्थ्यांपैकी ४२  हजार ३६६ विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. आयसीएसईच्या १२८९ तर सीबीएसईच्या ११३६ विद्यार्थ्यांचा तिसऱ्या गुणवत्ता यादीत समावेश आहे.



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा