Advertisement

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे.

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात
SHARES

राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयितांच्या जास्तीत जास्त चाचण्या घेण्यात येत आहेत. अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे.

त्यानुसार आता केवळ ७८० रुपयांमध्ये कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत जाऊन कोरोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा करोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांसाठी ४ हजार ५०० रुपये असा दर निर्धारित केला होता. प्रत्यक्षात मात्र या चाचण्यांसाठी लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात होते. मात्र सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनानं कोरोना चाचणीच्या दरात सातत्यानं कपात केली.

टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणीचे दर कमी करताना सप्टेंबर महिन्यात हे दर ९८० रूपयांपर्यंत कमी केले होते. आता कोरोना चाचणीसाठी लागणा्ऱ्या साहित्याच्या किंमतीत घट झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानंही लोकांना कमी दरात चाचणी करून मिळावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सध्याच्या दरात आणखी २०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड सेंटर, रुग्णालये, विलगीकरण केंद्र प्रयोगशाळा येथून नमुना (सँपल) गोळा करून तपासणी करण्यासाठी १ हजार २०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेऊन तपासणी करण्यासाठी १ हजार ६०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.



हेही वाचा

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस

कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा