विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला


  • विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला
  • विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला
SHARE

विक्रोळी - पार्कसाईट क्लासेस असोसिएशन आणि शिवसेना शाखा 123 च्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलंय. ही व्याख्यानमाला शिवाजी मैदानात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलं होतं. व्याख्यानमालेत गणिताचे व्याख्याते म्हणून नारायण गव्हाणे उपस्थित होते. यात 534 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या व्याख्यानमालेमध्ये पार्कसाईट विभागातील संदेश विद्यालय, सरस्वती विद्या निकेतन, विद्यादीप विद्यालय, व्यंकटेश विद्या निकेतन, विवेक विद्यालय आणि धनराजी पाल विद्यालय या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सहकार्य केलं. तसेच शिवसेनेच्या बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्या सहकार्यातून व्याख्यानमाला घेण्यात आली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या