महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एड्सविरोधात रॅली

  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एड्सविरोधात रॅली

SHARE

मुलुंड - येथील व्ही. जी. वझे महाविद्यालयतल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुलुंड पूर्व परिसरात एका रॅलीचं आयोजन केलं होतं. एड्स जनजागृती सप्ताह या संकल्पनेनुसार ही रॅली होती. या रॅलीत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या निमित्तानं संपूर्ण आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. रॅलीत पोस्टर पेंटिंग, पथनाट्यही सादर झालं. 'समाजात अजूनही एड्सग्रस्तांना सामावून घेतलं जात नाही. त्यांच्याबद्दल नेहमी परकेपणाची भावना बाळगली जाते. त्यामुळे या जनजागृती रॅलीचं आयोजन केलं,' अशी माहिती विद्यार्थिनी रक्षा कोपरकरनं दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या