• केसी कॉलेज विद्यार्थ्यांचं शौचालय बांधणी अभियान
SHARE

चर्चगेट - केसी कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पालघर जिल्ह्यातील सफालेतील करवाले गावात स्वच्छता अभियान राबवलं. 2005 साली केसी कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शौचालय बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. 2015 साली 49 कुटुंबाना शौचालय बांधून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या वेळी स्वच्छेतेविषयी इथल्या स्थानिकांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे आतापर्यंत हा परिसर 78 टक्के स्वच्छ झाल्याचं समोर आलंय. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी आर्थिक मदत केली. या वेळी केसी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.सतिश कोल्टे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या