Advertisement

Coronavirus update: आजारी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज नाही, शिक्षण विभागाची सूचना

महाराष्ट्रात ​कोरोना व्हायरसची​​​ (Coronavirus update) लागण झालेले ५ रुग्ण आढळून आल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने (state education department) सर्व शाळांसाठी सूचना जारी केली आहे.

Coronavirus update: आजारी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज नाही, शिक्षण विभागाची सूचना
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus update) लागण झालेले ५ रुग्ण आढळून आल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने (state education department) सर्व शाळांसाठी सूचना जारी केली आहे. विद्यार्थी आजारी असल्यास त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्याबाबतचे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. शिवाय कोरोनाचा (COVID-19) फैलाव होऊ नये, यासाठी काय दक्षता घ्यावी? याकरीता मार्गदर्शक नियमावली जारी करण्याचे निर्देशही शाळांना दिले आहेत.  

हेही वाचा- Coronavirus Update: मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा

शिक्षण विभागाने (state education department) जारी केलेल्या नाेटिशीत म्हटलं आहे की, एखाद्या विद्यार्थ्याला (school student) सर्दी-खोकला किंवा ताप आला असेल, तर त्याला शाळेत गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात यावी. तसंच खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल, टिश्यू पेपर धरणे, सर्दी-खोकला झालेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांमध्ये न मिसळणे, नाक, डोळे, तोंड यांना वारंवार हात न लावणे, आजारी व्यक्तीपासून एक मीटर लांब राहणे, नजीकच्या दवाखान्याला भेट देऊन तपासणी करणे, आपले हात वारंवार सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवून स्वच्छ करणे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शाळा प्रशासनाने दिशा-निर्देश जारी करावेत.

शाळेतील विद्यार्थ्यांना (school student) तोंडावर मास्क (mask) लावण्याची सक्ती कुठल्याही शाळेने करू नये. सध्या १० वी तसंच १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. अशी परीक्षा देणारे विद्यार्थी काही वेळापुरतेच शाळेत येतात. अशा वेळी मास्क घालावं की न घालावं याचा निर्णय विद्यार्थ्यांना घेऊ द्यावा. आजारपणातही मुलांना शाळेत पाठवल्यास पालकांना शाळेत बोलावून, त्यांच्यासोबतच परत घरी पाठवण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना शाळांनी दिल्या आहेत. महापालिका आपल्या पातळीवर कोरोनाचा शहरात फैलाव होऊ नये म्हणून जनजागृती करत आहे. तसंच टोल प्लाझा आणि रेल्वे स्थानकांवरही थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात यावं, अशी मागणी महापालिका नगरसेवकांनी केली आहे. 

हेही वाचा- कोरोना व्हायरसबाबत महापालिकेचं अफवा पसरवणारं पोस्टर

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus update) ५ रुग्ण आढळले असले, तरी मुंबईत अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांतील यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयपीएल तसंच अन्य क्रीडा स्पर्धांबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही टोपे म्हणाले.  

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठ आणि कॉलेजांना सार्वजनिक किंवा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. विद्यापीठ प्रशासनाने ३ कार्यक्रमांना बंदी घातली असतानाच, कॉलेजांत पदवी प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद, परिसंवादांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि यूजीसीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा