SHARE

सांताक्रुझ - बांधकाम व्यावसायिक आणि शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना ‘वाणिज्य व्यवसाय धोरण आणि प्रशासन’ या विषयात मुंबई विद्यापीठाची पीएचडी मिळाली आहे. ‘जागतिक रिअल इस्टेट व्यवसायाचे व्यवस्थापन आणि परवडणारी छोटी घरे यांचे प्रश्न’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. जगातील रिअल इस्टेट व्यवसायातील प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यवस्थापकीय तंत्राचा अभ्यास त्यांनी केला आहे. हावरे यांना वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. विवेक देवळणकर यांनी मार्गदर्शन केले. रिअल इस्टेट व्यावसायिकांनी प्रभावी व्यवस्थापन तंत्र वापरल्यामुळे उत्पादकता, तसेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे मत हावरे यांनी आपल्या प्रबंधात मांडले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या