Advertisement

पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक


पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक
SHARES
Advertisement

पालिका शाळेत आता दररोज सकाळी विद्यार्थ्यांना प्राथनेबरोबर सूर्यनमस्कार करणेही बंधनकारक असणार आहे. पालिका शाळेत सूर्यनमस्कार बंधनकारक करणे हा प्रस्ताव भाजपने मांडला होता..महापालिकेच्या महासभेत मांडलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेने ही पाठींबा दिला. त्यानंतर आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर झाला. भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे यांच्या ठरावाच्या सूचनेवर मंगळवारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी काँग्रेस, सपा आणि मनसेने या प्रस्तावाला विरोध केला होता. तर धर्माच्या नावावर इतर धर्माच्या मुलांना सूर्यनमस्कार करायला शिकवण्याचा हा कट आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना शाळेतून काढून टाकू असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केले. यासह प्रस्ताव फेटाळून लावण्याची जोरदार मागणीही केली.

संबंधित विषय
Advertisement