शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन


  • शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
SHARE

आझाद मैदान - गेले दोन वर्ष महापालिका मान्यता प्राप्त 43 विनाअनुदानित शाळेतील शिक्षक बिना वेतन काम करत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासनं मिळत आहेत. त्यामुळे या 43 शाळांमधील 450 शिक्षकांनी वेतन द्या अथवा, इच्छा मरण द्या अशी मागणी करत आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. राज्य खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोहर कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या