Advertisement

13 नोव्हेंबरला शिक्षक करणार राज्यभर अंदोलन


13 नोव्हेंबरला शिक्षक करणार राज्यभर अंदोलन
SHARES

मुंबईसह राज्यभरातील अनेक शाळांना आजही अनुदान मिळालेले नाही. गेली १७ वर्ष या विनाअनुदानित शाळा अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. अनुदान देण्याबाबत जीआरही काढण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत तो जीआर लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या १३ नोव्हेंबरला शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर, राज्यभरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलने करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कृती समितीने काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली आणि याबाबत निवेदनही दिले. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात अनुदानाबबात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप वर्ष झाले, तरी अनुदान लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या सोमवारी १३ नोव्हेंबरपासून शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर राज्यभर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलने करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली.


या आहेत शिक्षकांच्या मागण्या

१. राज्यभरातील शाळांना त्वरीत निधी मंजूर करून द्यावा

२. शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण करणाऱ्या सचिव व अधिकाऱ्यांना तात्काळ हटवावे

३. ४ ऑक्टोबर २०१६ ला झालेल्या आंदोलनावरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत



हेही वाचा

'शिक्षक मतदार नोंदणीची तारीख वाढवा', शिक्षकांची मागणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा