Advertisement

'शिक्षक मतदार नोंदणीची तारीख वाढवा', शिक्षकांची मागणी


'शिक्षक मतदार नोंदणीची तारीख वाढवा', शिक्षकांची मागणी
SHARES

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या लवकरच अद्यावत करण्यात येणार आहे. यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांना त्या कामासाठी जुंपण्यात येणार आहे. या याद्या ६ नोव्हेंबरपर्यंत अद्ययावत करा, असे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत याद्या कशा अद्यावत करायच्या? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.

शाळेतील शिक्षकांना पदवीधर मतदार नोंदणी आणि शिक्षक मतदार नोंदणीची यादी ६ नोव्हेंबरपर्यंत अद्यावत करायची आहे. मात्र मुंबईतील अनेक शाळा १ किंवा ३ तारखेपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे केवळ २ ते ३ दिवसांत यादी अद्यावत करणं कठीण असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. दिवाळी सुट्टीनंतर शाळेत मुले आल्यावर मुलांना शिकवायचं की यादी अपडेट करायची? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. या कामासाठी नोंदणीच्या तारखेत वाढ करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.


विधान परिषदेत निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे काही शाळा सोमवारी सुरू झाल्या असल्या तरी अनेक शाळा मुंबईत १ तारखेला सुरू होत असून नोंदणीसाठी अवघे ५ दिवस मिळत आहेत. यासंबंधी मुंबई जिल्हाधिकारी व शिक्षण निरीक्षक कार्यालयाने नोंदणी करण्यासाठी शाळांना पत्र दिलं आहे. ५ दिवसांत हे काम शक्य नसल्याने तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.

- अनिल बोरनारे, अध्यक्ष शिक्षक परिषद



हेही वाचा-

पदवीधर मतदार नोंदणी केलीत का? नसेल तर हे वाचा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा