Advertisement

मेधा स्पर्धेत नावीण्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना


मेधा स्पर्धेत नावीण्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना
SHARES

हाफकीन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेत द मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन (मेधा) ही स्पर्धा १३-१४ जुलै रोजी पार पडली. या स्पर्धेत १० टीम्सनी नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांची संकल्पना मांडली आणि वरिष्ठ डॉक्टर आणि अभियंत्यांसमोर सादर केली.

प्रत्येक टीममध्ये वैद्यकीय, डिझाइन, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक शाखांची पार्श्वभूमी असलेले सदस्य होतेआयआयटी मुंबईच्या बायोमेडिकल इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी इनोव्हेशन सेंटर (बेटिक) या विभागाद्वारे केजे सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नवी मुंबई इथलं एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या संस्थांच्या सहकार्यानं हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.


१४० स्पर्धकांचा सहभाग

१४० सहभागी स्पर्धकांमधून या ४० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय व्यावसायिकांनी समोर ठेवलेल्या २० वैद्यकीय समस्यांमधून त्यांनी एका समस्येची निवड केलीत्यांनी सादर केलेल्या उपाययोजनांमध्ये १५ सेकंदात पीएच पातळी मोजणारे उपकरण (पारंपरिक उपकरणानं दोन तास लागतात), स्लीप अॅप्नियासाठी नवं सीपीएपी उपकरण जे हवेचा दाब मोकळा करण्यासाठी व्हॉल्व्ह उपलब्ध करून देतं आणि एक असं उपकरण जे अपघातग्रस्त ठिकाणी नेऊन गुडघ्याखालील अवयव कापण्यासाठी स्टम्प म्हणून वापरता येऊ शकतं, अशा उपकरणांचा समावेश त्यात होता.


नावीण्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांची संकल्पना

इतर वैद्यकीय समस्यांमध्ये सीपीआर परिणामकारकतेचे मोजमाप, इंटेलिजंट ओटी लाइटनिंग यंत्रणा, लॅपरोस्कोपिक कॅमेऱ्यांसाठी डिफॉगर, एकाच कृतीनं रक्तातील साखरेची पातळी मोजणे, लॅरिन्जेक्टोमी करताना व्हॉइस प्रोस्थेसिसची स्वच्छता आणि क्लबफूट व्यंग मोजणे इत्यादी समस्यांवर उपाययोजना सादर करण्यात आल्या.

बेटिकचे एसईओ डॉरुपेश घ्यार म्हणाले, "स्पर्धकांसमोर तीन अनिश्चितता होत्या. समस्या काय आहेते कोणत्या टीम सदस्यांसोबत काम करणार आहेत? आणि कोणती साधने उपलब्ध असतील? डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स एकत्र येऊन कमी वेळात किती उत्तम परिणाम साध्य करू शकतात हे मेधामधून दिसून येतं."


विजेत्यांवर बक्षीचा वर्षाव

हॅकेथॉन शनिवारी सकाळी सुरू झाली तर रविवारी संध्याकाळी या स्पर्धेची सांगता झाली. या कालावधीत बेटिकमधील वरिष्ठ इनोव्हेटर्सनी सहभागी स्पर्धकांना सातत्यानं मार्गदर्शन केलं. हाफकीन संस्थेच्या संचालक निशिगंधा नाईक आणि बेटिकचे संस्थापक प्राबी. रवी यांनी या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसे दिली.

परीक्षकांमध्ये डॉनितीन महाजनडॉ. प्रशांत होवाळडॉ. आर. जी. करंदीकर, डॉ. उषा शर्माडॉ. नीलम शिरसाटडॉ. शारदा मेननडॉ. रजनी मुल्लेरपाटण, डॉ. रमेश लेकुरवाळे, डॉ. राजेश पाटीलडॉ. रमेश पुडाले आणि रिटा गुप्ता यांचा समावेश होता.

हाफकीन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेच्या संचालिका डॉनिशिगंधा नाईक (पीएचडी) म्हणाल्या, "वैद्यकीय समस्या सोडवण्यासाठी सहभागी स्पर्धकांकडे केवळ २४ तास होतेपरीक्षण समितीच्या सदस्यांनी दिलेल्या प्रोत्साहनपर आणि सकारात्मक प्रतिक्रिया पाहता हे निकाल खरेच लक्षणीय आहेत."

बेटिकचे संस्थापक प्रा. बी. रवी म्हणाले, "बेटिकनं आयोजित केलेले हे मेधाचे ९ वे पर्व होते. हाफकीन संस्थेशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या संस्थेत बेटिकची शाखा सुरू होणार आहेया संदर्भातील सामंजस्य करारावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आलीराज्यभरात बेटिकची १४ केंद्रे असून नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या केंद्रांचं जाळं तयार झालं आहे.



                      

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा