गुरुजी म्हणणार, चल बेटा सेल्फी ले ले रे!

 Pali Hill
गुरुजी म्हणणार, चल बेटा सेल्फी ले ले रे!

मुंबई - शाळेत विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते खरी, पण प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळेच्या आवारातच दिसून येतात. यावर तोडगा म्हणून शिक्षण विभागाने आणखी एक नवी शक्कल लढवली आहे. यापुढे दर सोमवारी शाळेतील मुलांसोबत सेल्फी घेऊन हे फोटो ‘सरल’मध्ये अपलोड करण्याचं नवं काम शिक्षकांना करावं लागणार आहे. या योजनेतून मुलांची शाळेतील गैरहजेरी कमी होणार असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. महिन्याच्या पहिल्या दोन सोमवारी शिक्षकांनी शाळेतील प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून सरल या वेबसाइटवर अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पुढील सोमवारी शाळेत वरचेवर गैरहजर राहणाऱ्या मुलांचे सेल्फी घ्यायचे आहेत. या मुलांचे फोटो त्यांच्या आधार नंबरसह ‘सरल’मध्ये अपलोड करावे लागणार आहेत. असं केल्याने फक्त गैरहजर राहणाऱ्या मुलांची माहिती मिळण्यास मदत होईल.

Loading Comments