Advertisement

एमपीएससीकडून उमेदवारांच्या अडचणी निवारणासाठी टोल फ्री सुविधा

एमपीएससी परिक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी, परीक्षेसंदर्भात शंका व इतर सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडवण्याचं काम या टोल फ्री सुविधेमार्फत केले जाणार आहे.

एमपीएससीकडून उमेदवारांच्या अडचणी निवारणासाठी टोल फ्री सुविधा
SHARES

एमपीएससीकडून उमेदवारांच्या अडचणी निवारणासाठी टोल फ्री सुविधा बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. एमपीएससी परिक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी, परीक्षेसंदर्भात शंका व इतर सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडवण्याचं काम या टोल फ्री सुविधेमार्फत केले जाणार आहे.

एमपीएससीने उमेदवारांना १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९1 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ आणि शनिवार, रविवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत टोल फ्री ची सुविधा असणार आहे. टोल फ्री क्रमांक व्यतिरिक्त उमेदवारांना support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना किंवा अर्ज भरताना व इतर तांत्रिक अडचणीमुळे संपर्क नेमका कसा करावा? व तात्काळ अडचण कशी सोडविता येईल? असा प्रश्न पडायचा. शिवाय, अनेकदा संपर्क करून सुद्धा शंका निवारण होत नव्हते. त्यामुळे या सुविधेमुळे उमेदवारांना आपले परिक्षेबाबतच्या अडचणी, शंका सोडविण्याचे काम एमपीएससीकडून केले जाणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा