• विद्यार्थी गिरवताहेत ट्रॅफिकचे धडे
SHARE

घाटकोपर- वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे सिग्नल. या यंत्रणेचा वापर करताना नियमांचं पालन होणंही तितकंच महत्त्वाचं. पण जर वाहतूक नियमांचे पालन करण्यास लहानपणीच शिकवलं तर, हो असाच उपक्रम सध्या मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगर पालिका ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून राबवत आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना, रस्ता ओलांडणे, सिग्नल कसा ओळखावा, पादचारी मार्गाचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं जातय. लहान वयातच शिक्षण मिळाल्यानं पुढे जाऊन स्वतः आणि आपल्या पालकांना देखील वाहतुकीची शिस्त पाळण्याचं आवाहन हे विद्यार्थी करणार आहेत.
या प्रशिक्षणातून शालेय विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन तर केलं जातय. पण आजच्या रस्त्याची स्थिती पाहता अधिक जणांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे हे मात्र निश्चित.

संबंधित विषय
ताज्या बातम्या