इच्छा मरण मागणाऱ्या शिक्षकांचं आंदोलन

 Mumbai
इच्छा मरण मागणाऱ्या शिक्षकांचं आंदोलन

आझाद मैदान - शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं. शिक्षण समितीच्या पुढील बैठकीत प्रशासनाने निर्णय न घेतल्यास मुंबई अध्यक्ष मनोहर कदम यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन किंवा प्राणोतिक उपोषण करणार असल्याचं इशारा संघटनेचे मनपा अध्यक्ष विनोद यादव यांनी दिला. 2014-15 सालापासून अनेक आंदोलन, पाठपुरावा करूनही केवळ शिक्षकांच्या पदरी आश्वासनच पडली. मात्र कोणताच निर्णय अद्याप झाला नाही. या शाळेतील 450 शिक्षक विनावेतन काम करत आहेत. या शाळा बहुतांश झोपडपट्टी भागात असून सुमारे 10 हजार विदयार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा विनाअनुदानित असल्यामुळे विदयार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजना मिळत नाही. त्यामुळे वेतन द्या अथवा इच्छा मरणाची परवानगी द्या असं मुंबई महापालिका मान्यता प्राप्त विनाअनुदानित 43 खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण समिती अध्यक्षांसह सर्व सदस्यांना पत्र लिहिले होते. मात्र याची दखल अजूनही कुणी घेतली नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं. 

Loading Comments