Advertisement

नेमकी चूक कुणाची?


नेमकी चूक कुणाची?
SHARES

मुंबई - जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडालाय. मुंबई विद्यापीठाच्या एमए भूगोल या अभ्यासक्रमातील हवामानशास्त्र या विषयाचा 21 नोव्हेंबरला पेपर होता. सदर विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. कारण एकाच विषयाच्या पेपरसाठी वेगवेगळ्या सेंटरवर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका दिसून आल्या. त्यामुळे संबंधीत विद्यार्थी, मुंबईविद्यापीठातील छात्रभारती या विध्यार्थी संघटनेचे संघटक लोकेश विद्या पुंजाजी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे किरण सावंत यांनी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांची भेट घेतली. 

पूर्वसूचना निवेदनात दिल्यानंतर देखील 26 नोव्हेंबरला वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्येही अर्थशास्त्र या पेपराच्यावेळीही असाच प्रकार झाला. त्यामुळे छात्रभारतीचे सागर भालेराव, लोकेश पुंजाजी, श्रीधर पेडणेकर, किरण सावंत यांनी परीक्षा नियंत्रक फर्ड यांची भेट घेतली असता पुन्हा तेच उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वांद्र्याच्या कॉलेजमध्ये जाऊन सोमवार 28 नोव्हेंबरला प्राचार्यांची भेट घेतली असता यात आमची चूक नाही असंच सांगण्यात आलं. त्यामुळे नेमकी चूक कुणाची असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा