Advertisement

अभिमत शब्द वापरा, नाहीतर विद्यापीठांवर कारवाई


अभिमत शब्द वापरा, नाहीतर विद्यापीठांवर कारवाई
SHARES

मुंबईत युनिव्हर्सिटीच्या पेपर तपासणीच्या अभूतपूर्व गोंधळामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्र भलतंच चर्चेत आलं आहे. मात्र त्यातच आता एका नवीन चर्चेची भर पडली आहे. आणि ती म्हणजे विद्यापीठांच्या नावाची!


काय आहे प्रकार?

अभिमत विद्यापीठांना स्वायत्त दर्जा असतो. त्यामुळे अशा विद्यापीठांना राज्यांचे नियम लागू होत नाहीत. विशेषत: प्रवेशशुल्क आणि प्रवेशविषयक नियम स्वत: ठरवण्याचा अधिकार अशा विद्यापीठांना असतो. मात्र, सध्या देशभरात आणि मुंबईतही अशी अनेक विद्यापीठे आहेत, जे नावापुढे 'अभिमत विद्यापीठ' असा उल्लेखच करत नाहीत. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा गोंधळ उडतो. शिवाय अऩेकदा, माहितीच नसल्यामुळे चुकीच्या किंवा इच्छा नसलेल्या विद्यापीठात प्रवेश घेतला जाण्याचेही प्रकार घडतात.


...म्हणून युजीसीने दिले आदेश

दरम्यान, या सर्व गोंधळामुळे देशभरातल्या सर्व अभिमत विद्यापीठांनी तसा उल्लेख स्वत:च्या नावात करावा असे आदेश युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी तसे आदेश देण्यासंबंधी युजीसीला ताकीद दिली होती.

युजीसीच्या यादीनुसार देशभरात एकूण १२३ अभिमत विद्यापीठे आहेत. त्यापैकी ८ विद्यापीठे मुंबईत आहेत. या विद्यापीठांनी त्वरीत आदेशांवर कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलून पुढील 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतही युजीसीने बजावले आहे. या आदेशांनुसार विद्यापीठांनी आपल्या नावापुढे कंसात 'अभिमत' असा शब्द वापरणे बंधनकारक आहे.


मुंबईतील अभिमत विद्यापीठ

  1. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, देवनार
  2. टाटा मूलभूत संशोधन संस्था, कुलाबा
  3. डॉ. होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मानखुर्द
  4. लोकसंख्या विज्ञान आंतरराष्ट्रीय संस्था, गोवंडी
  5. केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था, अंधेरी (प)
  6. इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, गोरेगाव (पू)
  7. रासायनिक तंत्रज्ञान संस्था, माटुंगा
  8. नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था, विले पार्ले
  9. एमजीएम इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्सेस, कामोठे
  10. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई



हेही वाचा

अर्थशास्त्र विभाग नाही, 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' म्हणा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा