Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

अर्थशास्त्र विभाग नाही, 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' म्हणा!


अर्थशास्त्र विभाग नाही, 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' म्हणा!
SHARES

राज्य सरकारने गुरूवारी मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे नाव बदलून 'मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पब्लिक पॉलिसी' असे ठेवण्यास मंजुरी दिली. एका बाजूला परीक्षांचे निकाल लावण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे केवळ नाव बदलून शिक्षण वा कामकाजात गुणवत्ता आणता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.

अर्थशास्त्र विभागाचे नाव बदलण्यासोबतच राज्य सरकारने या विभागाला सक्षम करण्यासाठी पुढील ५ वर्षांसाठी २५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.  शिवाय मुंबई विद्यापीठही स्कूलसाठी स्वतंत्रपणे १२५ कोटी रुपये देणार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (डीएसई) कडून प्रेरणा घेऊन राज्य सरकारने हा नाम बदलाचा निर्णय घेतला आहे.


कुठले अभ्यासक्रम?

या स्कूलमध्ये एमफिल आणि पीएचडी सोबतच डेटा अॅनालिटीक्स, पब्लिक पॉलिसी, फायनांशिअल इकॉनॉमिक्स इ. विषयांवर जागतिक दर्जाचे पदवी पूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. या बदलातून मुंबई अर्थशास्त्र विभागाला जागतिक संस्थेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे.


युजीसीची मान्यता

विद्यापीठ अनुदान आयोगा (युजीसी)ने या स्कूलला प्रगत अध्ययन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या उपक्रमातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग क्षेत्रातील ५ विषयासाठी पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांसाठी अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. हे अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सुरू करण्यात येतील.

एवढेच नव्हे, तर मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एसबीआय, आरबीआय अशा मोठ्या वित्तीय संस्थांना मार्गदर्शन देण्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला पूरक सल्लेही देणार आहे.हे देखील वाचा -

निकालांसाठी विद्यापीठाचं पुन्हा नवं गाऱ्हाणं, दिली सहावी डेडलाईनडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा