Advertisement

'शाळा-कॉलेजमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या'


'शाळा-कॉलेजमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या'
SHARES

सध्या देशात व राज्यात महिला व तरूणींवर अत्याचाराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, यामुळ महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक सामाजिक संस्था व संघटना काम करत असल्या तरी त्यांना स्वसंरक्षणाबाबत जागृत करणं महत्त्वाच आहे. यासाठी सर्व महिलांना विद्यार्थी दशेतच स्वसंरक्षणांचं प्रशिक्षण देण्यात यावं अशी विनंती शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.


'मग अत्याचार थांबेल'

गेल्या काही वर्षात मुंबई अनधिकृत शाळांचं प्रमाण वाढलं असून त्या ठिकाणी असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची शैक्षणिक पात्रता, त्याशिवाय शाळेतील स्वच्छतागृह, सीसीटीव्ही यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आहे. इतकंच नाही तर १५० वर्षांचा गाजावाजा करणाऱ्या मुंबई विद्यापीठात अद्याप एकही सीसीटीव्ही कार्यरत नसल्यानं काही नराधमांना मोकळं रान मिळालं आहे. त्यामुळ विविध शाळा, कॉलेज यांसारख्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणं गरजेचं आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळं शाळकरी मुलींवर होणारे अत्याचार, विनयभंग, बलात्कार यांसारख्या घटनांना निश्चितच आळा बसेल.सध्या महिलांवरील अत्याचार वाढत असल्यानं महिलांना अनेक अडचणींना तोंड द्याव लागतं आहे. त्यांना विद्यार्थी स्तरावरच सक्षम करून इयत्ता ५ वी पासूनच्या सर्व मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्यायला हवं. फक्त मुलींनाचं नव्हे तर मुलांनाही मुलींसोबत कशाप्रकारं वागावं याचं धडे आपण शालेय स्तरावर द्यायला हवेत. 

- आदित्य ठाकरे, अध्यक्ष युवासेना 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा